' यापूर्वी ५ वर्ष सत्तेत असलेल्यांकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव'-अनिल देशमुख

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाव न घेता भाजपावर निशाणा साधला आहे. एम्सने सुशांतसिंहच्या

Updated: Sep 29, 2020, 07:38 PM IST
' यापूर्वी ५ वर्ष सत्तेत असलेल्यांकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव'-अनिल देशमुख title=

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाव न घेता भाजपावर निशाणा साधला आहे. एम्सने सुशांतसिंहच्या व्हिसेरामध्ये विषाचा अंश नसल्याचं सांगतिल्यानंतर अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात अनिल देशमुख म्हणाले, मुंबई पोलिसांनी देखील आपला तपास या योग्य दिशेने केला होता. हे यावरून स्पष्ट होत आहे. मात्र राजकीय पक्षांतील काही मंडळींनी राजकारण करण्यासाठी मुंबई पोलिसांना बदनाम केले. 

ज्यांच्या हातात मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस मागील ५ वर्ष होते, त्यांनी देखील महाराष्ट्राला आणि पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, हे महाराष्ट्राच्या जनतेला आता स्पष्ट झालं आहे,  असा आरोप अनिल देशमुख यांनी केला.

मुंबई पोलिसांकडून केंद्र सरकारने सुशांतसिंह राजपूत आत्महत्येचा तपास काढून घेतला. सीबीआयकडे आत्महत्या प्रकरणाचा तपास चौकशीसाठी दिला. तो केंद्राचा अधिकार आहे, तो त्यांनी वापरला. पण हा मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा डाव होता. बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे करण्यात आले, राजकीय फायदा घेण्यासाठी हे करण्यात आले, असा आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

जे महाराष्ट्राच्या सत्तेत ५ वर्ष होते, त्यांच्याकडून देखील मुंबई पोलिसांना आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव केला. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे केले गेले, असा आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपचं नाव न घेता केला आहे.