अमृता फडणवीस यांच्या या शब्दांनी जिंकलेल्या शत्रूचेही बुरुज हादरवले...!

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला हे उघड आहे. यानिमित्ताने विरोधीपक्षनेते

Updated: Dec 4, 2020, 06:57 PM IST
अमृता फडणवीस यांच्या या शब्दांनी जिंकलेल्या शत्रूचेही बुरुज हादरवले...! title=

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला हे उघड आहे. यानिमित्ताने विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची संधी आता लहान मोठे विरोधक, जुने मित्र पण आताचे नवे राजकीय शत्रू असं कुणीही सोडताना दिसत नाहीय. यावर देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय साध्या सोप्या शब्दात टीकेला उत्तर दिलं आहे की, महाविकास आघाडीची ताकद आम्ही ओळखू शकलो नाही.

पण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवतींनी टीका करणाऱ्यांना शब्दांनी झोडपून काढल्यासारखं ट्ववीट केलं आहे. यामुळे विरोधकांना भाजपाचा पराभव झाला असं वाटणार नाही, तर पराभव करण्यासाठी आणखी काम करावं लागेलं असं नक्कीच वाटेल.

तर महाविकास आघाडीचा हा विजय की पराभवापूर्वीचा विजय असं विचार करण्याची वेळ अमृता फडणवीस यांनी एका ट्ववीटद्वारे केली आहे. वाईट सुरूवातीचा शेवट चांगला असतो, असं ट्ववीट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

अमृता फडणवीस या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणत्या तरी कारणाने चर्चेत असायच्या. मात्र आता देवेंद्र फडणवीस जरी विरोधी पक्षनेतेपदी असले, तरी देखील अमृता फडणवीस या राजकारणाच्या बाबतीत चर्चेत राहत आहेत, हे नक्की.