Amruta Fadnavis Blackmail Case Anil Jaisinghani Arrested : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांना ब्लॅकमेलिंग प्रकरणातील बुकी अनिल जयसिंघानी अखेर मुंबई पोलिसांनी जेरबंद केलं आहे. 5 राज्यात वॉन्टेड, 8 वर्षांपासून फरार गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. 5 विशेष पोलीस पथकं आणि 72 तासाचा ऑपरेशनच्या थरारानंतर तो पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. पोलिसांनी या सगळ्या ऑपरेशनबद्दल सांगितलं. चला जाणून घेऊयात अनिल जयसिंघानी अटक ऑपरेशनचा प्रत्येक घटनाक्रम...(Amruta Fadnavis Blackmail Case anil jaisinghani arrested 72 hours 5 Special Police Squads mumbai gujrat Police operation Crime News in marathi)
अनिल जयसिंघानीला जेरबंद करण्यासाठी मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेची 5 पथकं तयार केली होती. ती राज्यांमधील वेगवेगळ्या शहरात अनिलचा शोध घेत होती. चौकशीदरम्यान पोलिसांच्या असं लक्षात आलं की अनिक शिर्डीतून गुजरातला पळाला आहे. मग मुंबई पोलिसांचे 3 पथकं गुजरातच्या दिशेने वळली. तिथे गेल्या सुरत पोलिसांशी संपर्क साधला.
मग मुंबई पोलीस, सुरत पोलीस, सुरत ग्रामीण पोलीस आणि गोध्रा, इतर पोलीस सगळी कामाला लागली. 5 दिवस आणि 5 पथकं...असा हा ऑपरेशनचा थरार..अनिल बार्डोलीत आहे हे कळलं. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. पण तो पोलिसांच्या तावडीतून निसटला...
तो निसटून सुरतमध्ये जाऊन बसला. पण पोलीस आपल्या मागावर आहे हे त्याला लक्षात आलं होतं. आता एका ठिकाणी लपवून राहणं त्याचासाठी धोकादायक होतं. म्हणून अनिल वडोदरा, भरुच मार्गे गोध्राला पळून जाण्याचा तयारीत असताना त्याला पोलिसांनी धरपकडलं.
गुजरात पोलिसांच्या मदतीने अनिल जयसिंघानीला गुजरातच्या कलोलमध्ये अटक करण्यात आली अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. आरोपी अनिलसोबत मोबाईल, एक कार, विविध उपकरणं जप्त करण्यात आली आहे. याशिवाय अनिलला जो कोणी मदत करत होता त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. सध्या अनिल हा मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात आहे. तिथे त्याची चौकशी सुरु आहे.
Accused Anil Jaisinghani arrested from Gujarat by Mumbai Crime Branch for allegedly threatening and blackmailing Amruta Fadnavis, wife of Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis. He was on the run.
— ANI (@ANI) March 20, 2023
अनिल जयसिंघानी हा मोटा बुकी असून तो उल्हासनगरमध्ये राहत होता. त्यावर 5 राज्यात 17 गुन्हे दाखल आहेत. गेल्या 8 वर्षांपासून तो फरार होता. सट्टेबाजी प्रकरणात आतापर्यंत अनिल जयसिंहानीला तीन वेळा अटक करण्यात आली आहे. इतकंच नाही तर गोवा पोलिसांनी 11 मे 2019 ला अनिलच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी केली होती.
Mumbai | Operation AJ was launched to nab the accused who is booked under several other cases. The accused was arrested y'day night from Gujarat after 72 hr of joint operation with Gujarat police. He is an expert in Internet technology and mobile technology and he can also… https://t.co/mMX7iU9jPG pic.twitter.com/oFiPKAGc9Y
— ANI (@ANI) March 20, 2023
अमृता फडणवीस यांनी एक महिन्यापूर्वी बरोबर 20 फेब्रुवारीला डिझायनर अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.अनिक्षाविरोधात लाच देण्याचा प्रयत्न आणि धमकीचा आरोप करण्यात आला आहे. तिला पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं. अमृता फडणवीस यांनी आपल्या तक्रारीत म्हटल्यानुसार अनिक्षा नावाची महिला 2021 मध्ये भेटली. आपण एक डिझायनर असून पब्लिक इव्हेंटमध्ये आपण डिझाईन केलेले कपडे आणि ज्वेलरी परिधान करावी, जेणेकरुन त्याचं प्रमोशन होईल. हळूहळू तिने अमृता यांचा विश्वास संपादित केला. त्यानंतर अनिक्षाने अमृता यांना माझ्या वडिलांना एका प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आले आहे त्यामुळे तुम्ही त्यांना सोडवा अशी विनंती केली. अनिक्षा जयसिंघाने या मुलीने आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी एक कोटी रुपये देऊ असं अमृता यांना सांगितलं. त्यामुळे अमृता यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आणि हे प्रकरण उघड झालं.