बंडातात्या कराडकरांच्या वादग्रस्त वक्तव्यामागे BJP आणि RSS? अमृता फडणवीस यांनी दिलं उत्तर

बंडातात्या कराडकरांच्या वादग्रस्त वक्तव्यामागे भाजप आणि आरएसएस असल्याचा होत आहे आरोप

Updated: Feb 4, 2022, 03:21 PM IST
बंडातात्या कराडकरांच्या वादग्रस्त वक्तव्यामागे BJP आणि RSS? अमृता फडणवीस यांनी दिलं उत्तर title=

मुंबई : हभप बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानावर चांगलीच टीका होऊ लागली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्ष नेते अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी स्त्रीयांविषयी बोलताना विचार करुन बोललं पाहिजे असं म्हटलं आहे. बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वक्तव्यामागे भाजप आणि आरएसएसचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. यावर बोलताना भाजप आणि आरएसएस हे स्त्रियांचा सन्मान करणारे असून पुरोगामी असल्याचं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

स्त्रीयांनी आपल्या देशात आधीच खूप भोगलं आहे, स्त्रीयांवर टिपण्णी करणं आणि विशेष करुन त्यांच्या प्रायव्हेट लाईफवर बोलणं हे अतिशय चुकीचं आहे, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आरएसएस पुरोगामी आहे, स्त्रियांचा मान ठेवणं हे प्रथम कर्तव्य आहे आणि ते पार पाडतात.  मी नॉन पॉलिटिकल व्यक्ती आहे. पण भाजप आणि संघाच्या जवळ आहे. स्त्रियांचा सर्वात जास्त कोण आदर करत असेल तर आरएसएस करतं, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ही मानसिकतेची गोष्ट आहे, आपल्याला विचार करायला हवं की आपण काय बोलतो, आणि काय बोलायला नको, स्त्रियांच्या बाबतीत नेहमीच कोणी काही बोललं किवा स्त्रियांवर अत्याचार झाला की कारवाई केली जाते, पण आपल्याला मानसिकता बदलली पाहिजे, असा सल्लाही अमृता फडणवीस यांनी दिला आहे.