काँग्रेसचे बलाढ्य नेते अमरिशभाई पटेल लवकरच भाजपात - चंद्रकांत पाटील

 पण शिरपूर मतदारसंघ आदिवासी राखीव झाल्यानंतर तेथून त्यांचे निकटवर्तीय काशीनाथ पावरा हे निवडून आले.

Updated: Sep 30, 2019, 04:10 PM IST
काँग्रेसचे बलाढ्य नेते अमरिशभाई पटेल लवकरच भाजपात - चंद्रकांत पाटील title=

मुंबई : खानदेशातील काँग्रेस नेते आणि धुळे जिल्ह्याच्या राजकारणातील मोठी हस्ती समजले जाणारे अमरिशभाई पटेल हे देखील काँग्रेससोडून लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचं, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. अमरिशभाई पटेल हे शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. पण शिरपूर मतदारसंघ आदिवासी राखीव झाल्यानंतर तेथून त्यांचे निकटवर्तीय काशीनाथ पावरा हे निवडून आले.

काशिनाथ पावरा यांनी देखील आज काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला आहे, त्यांच्या प्रवेशावेळी चंद्रकांत पाटील यांनी अमरिशभाई पटेल हे लवकरच भाजपात येणार असल्याची घोषणा केली.

शिरपूर तालुक्यातील काँग्रेसचे नेते आणि अमरिशभाई पटेल यांचे निकटवर्तीय प्रभाकर चव्हाण यांनी देखील भाजपात आज प्रवेश केला. शिरपूर हा अमरिशभाई पटेल यांचा बालेकिल्ला आहे. असं म्हणतात, की अमरिशभाई पटेल ज्यांना पाठिंबा देतात, तोच उमेदवार निवडून येतो.