सुस्मिता भदाणे, मुंबई : आशिया खंडात सर्वात जास्त वजनाच्या महिलेनं आपले वजन तब्बल २१४ किलोने घटवले आहे. वसईच्या अमिता राजानी यांचं वजन ३०० किलो होते. चार वर्षांपूर्वी त्यांच्यावर बेरिअॅट्रीक सर्जरी केली होती. राजानी यांनी आहारात केलेले बदल आणि व्यायामामुळे त्यांचे वजन २१४ किलोनी कमी झाले आहे. अमिता आता ८६ किलोची आहे.
वयाच्या सहाव्या वर्षापासून अमिताचं वजन वाढायला सुरुवात झाली. वयाच्या सहाव्या वर्षी तिचं वजन १२६ किलो होते. भारत आणि इंग्लंडमधल्या तज्ज्ञांनाही यावर उपाय करता येत नव्हता. ३०० किलो वजन झाल्यावर तिला घराबाहेर पडणेही अशक्य झाले होते.
शस्त्रक्रियेपूर्वी दोन महिन्यांची पूर्वतयारी करण्यात आली. त्यासाठी एक विशेष रुग्णवाहिका सज्ज करण्यात आली होती. त्या रुग्णवाहिकेचे दरवाजे काढले होते. आता अमितावर झालेल्या या शस्त्रक्रियेचा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदविण्याच्या प्रयत्न केला जाणार आहे.