मुंबई : भाजपच्या ३८ व्या स्थापना दिनानिमित्तानं मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उपस्थित होते. 'भाजपाच्या स्थापना दिवसावर पक्षाच्या करोडो कार्यकर्त्यांना आणि शुभचिंतकांचे मी आभार मानतो' असं अमित शहा यांनी म्हटलंय.
भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात सर्वात जास्त कार्यकर्त्यांचं बलिदान भारतीय जनता पक्षानं दिलंय. मी त्या सर्व बलिदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
काँग्रेसच्या कार्यकाळात दहशतवादी सीमेपर्यंत घुसले होते, भाजपनं त्यांच्या सीमेत जाऊन जवानांच्या मृत्यूचा बदला घेतला
काँग्रेसच्या काळात १२ जवानांना जिवंत जाळण्यात आलं होतं, पण आम्ही पाकिस्तानात घुसून त्यांना मारलं
भाजपचा सुवर्णकाळ तेव्हा येईल जेव्हा पश्चिम बंगाल, ओडिसा आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत भाजप जिंकून येईल
राहुल गांधी आणि शरद पवार SC/ST कायद्यावर अफवा पसरवत आहेत
आम्ही जनतेमध्ये चर्चेस तयार... भाजप आरक्षण कधीही रद्द करणार नाही - अमित शहा
मोदींच्या नेतृत्वाखाली देशात कमळ फुललं... विकासाच्या मुद्यावर २०१९ ची निवडणूक जिंकू
राहुल गांधींना पवारांनी इंजेक्शन दिलं - अमित शहा
राहुलबाबा आमच्याकडे चार वर्षांचा हिशोब मागत आहेत... पण, चार पिढ्या तुमच्याकडे हिशोब मागत आहेत, अमित शहांची राहुल गांधींवर टीका
राज्यात घरोघरी जाऊन कामांची माहिती द्या, अमित शहांचं कार्यंकर्त्यांना आवाहन