अमित शाह तीन दिवसांच्या मुंबई दौ-यावर

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह शुक्रवारपासून तीन दिवसांच्या मुंबई दौ-यावर येत आहेत. कर्जमाफीच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजप-शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. शिवसेनेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेतेही सरकारच्या कारभारावर जाहीर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा आगामी मुंबई दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Updated: Jun 15, 2017, 08:44 AM IST
अमित शाह तीन दिवसांच्या मुंबई दौ-यावर title=

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह शुक्रवारपासून तीन दिवसांच्या मुंबई दौ-यावर येत आहेत. कर्जमाफीच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजप-शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. शिवसेनेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेतेही सरकारच्या कारभारावर जाहीर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा आगामी मुंबई दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

राज्यातील आगामी राजकारणाच्या दृष्टीनं काय फासे टाकावेत, याचा आढावा घेण्यासाठी अमित शाह येणार असल्याचं समजतं आहे. मात्र याशिवाय अमित शाहांच्या मुंबई दौ-याचा आणखी एक खास हेतू असल्याचं सांगितलं जातंय. दादर-माहिमचा परिसर म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात भाजपची पाळंमुळं कशी रूजवता येतील, यादृष्टीनं ते या भागातील स्थानिक लोकांशी संवाद साधणार असल्याचं समजतं आहे. पण भाजपला ते सहज शक्य होणार नाही, असं स्थानिक शिवसेना-मनसे नेत्यांचं म्हणणं आहे.