Crime News : अंबरनाथ हादरलं! घराला हातभार लावणाऱ्या पोटच्या मुलाची निर्दयी बापाकडून हत्या

Crime News : स्थानिकांच्या सतर्कतेमुळे आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलाचा मृतदेह टाकून पळ काढताना स्थानिकांनी आरोपीचा पाठलाग केला आणि त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले

Updated: Feb 16, 2023, 10:25 AM IST
Crime News : अंबरनाथ हादरलं! घराला हातभार लावणाऱ्या पोटच्या मुलाची निर्दयी बापाकडून हत्या title=

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, अंबरनाथ : 12 वर्षाच्या मुलाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये (Ambernath News) समोर आलीय. यानंतर मुलाचा मृतदेह (crime news) नाल्यात फेकल्याणा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या (Police) स्वाधीन केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलाच्या बापानेच त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. मुलाचा मृतदेह नाल्यात फेकण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिकांनी निर्दयी बापाला पाहिल्यानंतर त्याने पळ काढला होता. मात्र लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

12 वर्षाच्या मुलाचा चिरला गळा

अंबरनाथ पश्चिमेकडील स्वामी नगरमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. आकाश असे हत्या झालेल्या मुलाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी आनंदकुमार हा आकाशचा पिता आहे. त्यानेच आकाशचा गळा चिरला आणि त्याचा मृतदेह नाल्यात फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथल्या स्थानिकांनी आनंदकुमार याला आकाशचा मृतदेह नाल्यात फेकताना पाहिले. लगेचच स्थानिकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न करताच आनंदकुमारने तिथून पळ काढला. मात्र त्याचा पाठलाग करत लोकांनी त्याला पकडले आणि पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली आहे.

भाजी विकून कुटुंबाला लावत होता हातभार

आरोपी आनंदकुमार गणेश हा गटार साफ करायचे काम करत होता. तर आकाश हा अंबरनाथ रेल्वे स्थानकाबाहेर भाजी विक्रीचे काम करत होता. बुधवारी रात्री आनंदकुमारने आकाशची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने आकाशचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आनंदकुमारने त्याचा नाल्यात फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिकांनी त्याला पाहिल्याने तो घाबरला आणि मृतदेह तिथेच टाकून त्याने पळ काढला. हा सर्व प्रकार पाहिलेल्या लोकांनी आनंदकुमारचा पाठलाग केला आणि त्याला पकडले. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दरम्यान आनंदकुमारने आकाशची हत्या का केली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.