ALTO, Wagon R देणार १५० किमीचं मायलेज, इंजीनमध्ये केला जातो हा छोटासा बदल

यामुळे तुमचे फक्त पैसेच वाचणार नाहीत. तर इंधनाचा खर्च देखील वाचणार आहे. 

Updated: Nov 13, 2018, 12:53 PM IST
ALTO, Wagon R  देणार १५० किमीचं मायलेज, इंजीनमध्ये केला जातो हा छोटासा बदल title=

मुंबई : पेट्रोल डिझेलच्या किंमती सतत वाढत असल्याने मोदी सरकारकडून इलेक्ट्रीक वाहन खरेदीवर जोर दिला जात आहे. सरकारचा उद्देश आहे २०३० पर्यंत देशात १०० टक्के इलेक्ट्रीक वाहन रस्त्यावर असावीत. अशावेळी तुमच्याकडे देखील संधी आहे की, तुमच्या जुन्या गाडीला तुम्ही इलेक्ट्रीक कारमध्ये (Retrofitting) बदलू शकतात.

यामुळे तुमचे फक्त पैसेच वाचणार नाहीत. तर इंधनाचा खर्च देखील वाचणार आहे. अंदाजाने पेट्रोल-डिझेल कारवर प्रति किमी साडेसहा रूपये खर्च होतो. तर इलेक्ट्रीक कारमध्ये प्रतिकिमी १ रूपया देखील खर्च होत नाही.

हैदराबादच्या कंपनीला लायसन्स

एका मीडिया रिपोर्टनुसार, जर कारच्या मालकाला त्याची जुनी गाडी इलेक्ट्रीक कारमध्ये कन्वर्ट करायची असेल, तर हैदराबादची एक कंपनी ऑफर घेऊन आली आहे. हैदराबादची स्टार्टअप कंपनी ई-ट्रायो (E-Trio) ही पहिली अशी कार फर्म आहे तिला ARAI ने मान्यता दिली आहे. (ARAI -ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया).

ही कंपनी सध्याच्या कारमध्ये रेग्युलर आयसी इंजीन रेट्रोफिट करू शकते. या कंपनीला मारूती अल्टो  (Alto) आणि वॅगन आर  (Wagon R) गाडीला संपूर्ण इलेक्ट्रीक कारमध्ये कन्वर्ट करण्याचं लायसन्स मिळालेलं आहे.

कन्वर्ट अशी करतात कार

इलेक्ट्रीक किटमध्ये मोटार आणि बॅटरी बसवली जाते. हे उपकरण दक्षिण कोरिया आणि चीनमधून मागवले जातील. ई-ट्रायोने कंट्रोलरला स्वत: विकसित केलं आहे. रशलेनच्या बातमीनुसार कंपनीने इलेक्ट्रीक किटबद्दल खोल माहिती दिलेली नाही.

पण मीडिया रिपोर्टनुसार कंपनीचा दावा आहे की, रेट्रोफिटेड आल्टो आणि वॅगन आर इलेक्ट्रीक वाहन सिंगल चार्जिंग केल्यानंतर १५० किमीपर्यंत जावू शकतं. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, या वाहनांना कुठेही आणि कधीही चार्ज करता येऊ शकतं.

एका महिन्यात १००० कार कन्वर्ट होतील

कंपनीची योजना १ महिन्यात १ हजार कार इलेक्ट्रीकमध्ये कन्वर्ट करण्याची आहे. कंपनी पहिल्या वर्षी ५ हजार कन्व्हेन्शल कारना इलेक्ट्रीक कारमध्ये कन्वर्ट करणार आहे. कंपनी इलेक्ट्रीक किटमध्ये सुधारणा करण्यासाठी आणखी रिसर्च करीत आहे. सोबत एआरएआयसोबत इतर गाड्यांना पेट्रोलपासून इलेक्ट्रीकमध्ये कन्वर्ट करण्याच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहेत.