मुंबई : 'रक्षाबंधन' हा बहिण-भावाच्या नात्यातील अतुट प्रेम जपणारा सण. यंदाच्या वर्षी सगळ्या सणांवर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या घरीच सण साजरा करत आहेत. अशावेळी अलर्ट सिटीझन फोरम या सामाजिक संस्थेने अनोखा उपक्रम केलाय. या संस्थेमार्फत अनोखा उपक्रम राबविण्यात आलं. 'आपुलकीची राखी' या उपक्रमातून त्यांना सामाजिक बांधिलकी जपली आहे.
मोखाडा या तालुक्यामधील आदिवासी भगिनींनी बांबूच्या अत्यंत सुंदर कलाकुसर केलेल्या राख्या बनवल्या आहेत. या राख्या अलर्ट सिटीझन फोरम माध्यमामार्फत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. या राख्यांची किंमत ३० रुपये /प्रति राखी अशी आहे. या सामजिक उपक्रमातून जमा झालेली रक्कम पुन्हा आदिवासी महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून उर्वरित रक्कम मुलांच्या शैक्षणिक मदतीसाठी उपयोगात आणली जाणार आहे.
आदिवासी महिलांनी हस्तकलेतून या सुंदर राख्या तयार केल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहेत. राजेश लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलर्ट फोरम सिटीझन ही संस्था गेली ७ वर्षे हा उपक्रम राबवत आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न संस्थेने केला आहे. आजपर्यंत २६५२ राख्या या उपक्रमामार्फत घरपोच पोहोचवल्या आहेत.
लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन विक्रीला मागणी वाढली आहे. अशावेळी संस्थेने देखील ऑनलाईनचा पर्याय स्विकारला आहे. लोकं घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे याकाळात संस्थेचे काही सदस्य बहिणींनी दिलेल्या पत्त्यावर त्यांच्या भावाची राखी पोहोचवत आहेत.
या उपक्रमामुळे बहिण-भावाचं अतुट नातं देखील जपलं जातं आहे. आणि या आदिवासी महिलांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे.