पुणे : अत्यंत कडक शिस्तीचे आणि नियमाचे बंधन पाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार ( DCM Ajit Pawar ) हे वाहतूक नियमांच्या कचाट्यात सापडले आहेत. वाहतुकीचे नियम मोडल्यावरून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलीय.
केवळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच नाही तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ), गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Valse Patil ), राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ( Dattatray Bharne ) हे ही वाहतुकीचे नियम मोडण्यात आघाडीवर आहेत.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना 600 रुपये दंड करण्यात आलाय. सर्वानी कायद्याचे आणि नियमाचे पालन करवाई असे सांगणारे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही वाहतुकीचे नियम मोडला म्हणून 5 हजार 200 रुपयांचा दंड झाला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही दंड झाला आहे. पण, त्यांनी हा दंड अजून भरलेला नाही. पाटील यांच्याकडे दंडाच्या रकमेची सर्वाधिक 14 हजार 200 रुपयांची थकबाकी आहे.
तर, कडक शिस्तीचे उपपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहतुकीचे नियम तोडले म्हणून दंड झाला. अजित पवार यांनी हा दंड भरला. एकूण 27 हजारांचा दंड त्यांनी भरला.