मदतीला गेलेल्या एअरहॉस्टेसची पायलटने काढली छेड

धक्कादायक प्रकार आला समोर

Updated: May 7, 2018, 12:36 PM IST
मदतीला गेलेल्या एअरहॉस्टेसची पायलटने काढली छेड title=

मुंबई : एयरक्राफ्ट अॅक्‍ट हा प्रवाशी आणि विमानातील क्रु मेंबरच्या सुरक्षेसाठी आहेत पण याचाच फटका एका एअरहॉस्टेसला बसला आहे. विमानामध्ये कॉकपिटमध्ये पायलटने एअरहॉस्‍टेसची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदाबाद ते मुंबई एयर इंडियांच्या विमानात हा धक्कादायक प्रकार घड़ला. मुंबई पोहोचताच एअरहॉस्‍टेसने सहार पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पीडित एअरहॉस्‍टेसच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार एअरहॉस्‍टेसची ड्यूटी अहमदाबाद-मुंबई एअर इंडियाच्या फ्लाइट एआई-985 मध्ये होती. अहमदाबाद एअरपोर्टवरुन संध्याकाळी 7.30 वाजता विमान निघालं. विमान उड्डान झाल्यानंतर कॉकपिटमधून एक पायलट वॉशरूमसाठी बाहेर आला. नियमानुसार एअरहॉस्टेसला कॉकपिटमध्ये असलेल्या दुसऱ्या पायलटच्या मदतीला जावं लागलं. या दरम्याच याचा फायदा उचलत पायलटने एअरहॉस्टेसची छेड काढली.

कॉकपिटमधून बाहेर पळाली एअरहॉस्टेस

नियमानुसार दुसरा पायलट येईपर्यंत एअरहॉस्टेस कॉकपिटमधून बाहेर नाही येऊ शकत. त्यामुळे तिला कॉकपिटमध्ये राहणं भाग होतं. नाहीतर नियमानुसार तिच्य़ावर कारवाई झाली असती. त्य़ामुळे दुसरा पाय़लट येईपर्यंत एअरहॉस्टेस याला विरोध करत राहिली. दुसरा पायलट आल्यानंतर ती लगेचच कॉकपीटमधून बाहेप पळाली आणि घडलेली घटना इतर क्रू-मेंबरला सांगितली. विमान मुंबईला पोहोचताच एअरहॉस्टेसने पायलटविरोधात गुन्हा दाखल केला.