एअर इंडियामध्ये बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना मुंबईत भरघोस पगाराची नोकरी

Air India Job: इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड अंतर्गत हॅंडीमन आणि यूटिलिटी एजंटच्या एकूण 998 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. हँडीमनच्या एकूण 971 जागा असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Pravin Dabholkar | Updated: Sep 14, 2023, 03:58 PM IST
एअर इंडियामध्ये बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना मुंबईत भरघोस पगाराची नोकरी title=

AIASL Recruitment 2023: दहावी उत्तीर्ण असून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड अंतर्गत बंपर भरती सुरु असून दहावी उत्तीर्णांना येथे चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची अंतिम तारीख, पगार यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड अंतर्गत हॅंडीमन आणि यूटिलिटी एजंटच्या एकूण 998 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. हँडीमनच्या एकूण 971 जागा असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

यूटिलिटी एजंट (पुरुष) च्या एकूण 20 तर यूटिलिटी एजंट (महिला) च्या एकूण 7 रिक्त जागा भरल्या जातील. यासाठी उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 21 हजार 330 रुपये पगार दिला जाणार आहे. 

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 सप्टेंबर 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. एससी/एसटी पदासाठी 5 वर्षे तर ओबीसीसाठी 3 वर्षे सवलत देण्यात येणार आहे. जनरल/ओबीसी उमेदवारांकडून 500 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येणार आहे. तर एससी/एसी/एक्स सर्व्हिसमनकडून कोणतेही शुल्क घेण्यात येणार नाही.  या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 21 हजार 330 रुपये पगार दिला जाणार आहे. 

MRVC Job: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये भरती, लेखी परीक्षेची गरज नाही

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शारीरिक सहनशक्ती चाचणी (जसे की वजन उचलणे, धावणे) घेतली जाईल. केवळ शारीरिक सहनशक्ती चाचणीत पात्र ठरलेल्यांना मुलाखतीसाठी पाठवले जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्या. वैयक्तिक/आभासी स्क्रीनिंग निवड प्रक्रिया त्याच दिवशी किंवा त्यानंतरच्या दिवशी (दिवस) आयोजित केली जाईल. मुंबई बाहेरुन आलेल्या उमेदवारांना स्वखर्चाने यावे लागेल तसेच त्यांची राहण्याची व्यवस्था केली जाणार नाही, याची नोंद घ्या. 

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये दहावी ते पदवीधरांना नोकरी, 44 हजारपर्यंत मिळेल पगार

निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत नोकरी करावी लागणार आहे. उमेदवारांनी आपले अर्ज एचआरडी डिपार्टनेमेंट, एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिस लिमिडेट, जीएसडी कॉम्प्लेक्स, सहारा पोलीस स्टेशनजवळ, सीएसएमआय एअरपोर्ट, टर्मिनल-2, गेट नंबर-5, अंधेरी (पूर्व)  मुंबई-400099 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. 18 सप्टेंबर 2023 ही अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे.