जेजे पाठोपाठ सायन रूग्णालयातील निवासी डॉक्टरही संपावर जाणार

जेजे रूग्णालयातील निवासी डॉक्टरांपाठोपाठ आता सायन रूग्णालयातील निवासी डॉक्टरही संपावर जाणार आहेत. 

Updated: May 20, 2018, 11:24 PM IST
जेजे पाठोपाठ सायन रूग्णालयातील निवासी डॉक्टरही संपावर जाणार  title=

 मुंबई : जेजे रूग्णालयातील निवासी डॉक्टरांपाठोपाठ आता सायन रूग्णालयातील निवासी डॉक्टरही उद्या ( सोमवार )  संपावर जाणार आहेत. सायन रूग्णालयातील सुमारे ४५० निवासी डॉक्टरांचे उद्या कामबंद आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाली आहे. केईएम आणि नायर रूग्णालयातील निवासी डॉक्टरही संपावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

 का जाणार संपावर ? 

मागण्या मान्य होत नसल्यानं मार्डने पुन्हा संपाचे हत्यार उपसले आहे. शनिवारी जेजे रूग्णालयात २ निवासी डॉक्टरांना मारहाण झाल्यानंतर मार्डने कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दोन वर्षांपूर्वी अलार्म सिस्टीम बसवण्याचे मान्य करूनही बसवली न गेल्याचा मार्डचा आरोप आहे.