अभिनेत्री मिनाक्षी थापा हत्येप्रकरणी तिचा मित्र, मैत्रिण दोषी

नवोदित अभिनेत्री मिनाक्षी थापा हत्येप्रकरणी तिचा मित्र आणि मैत्रिणीला दोषी ठरवण्यात आले आहे. 

Updated: May 10, 2018, 11:37 AM IST
अभिनेत्री मिनाक्षी थापा हत्येप्रकरणी तिचा मित्र, मैत्रिण दोषी title=

मुंबई : नवोदित अभिनेत्री मिनाक्षी थापा हत्येप्रकरणी तिचा मित्र आणि मैत्रिणीला दोषी ठरवण्यात आले आहे. २०१२ साली शूटिंगला जाण्याच्या खोट्या बहाण्याने मिनाक्षीला तिचा मित्र अमित जयस्वाल अलाहबादला घेऊन गेला होता. तिथे त्यांची मैत्रिण प्रिती सुरीन रहात होती. पैशांच्या हव्यासानं या दोघांनीही मिनाक्षीचा खून करुन तिचं डोकं शरीरापासून वेगळं केलं होतं. तिला किडनॅप करुन तिच्या कुटुंबीयांकडून पैशांची मागणी करण्यात येणार होती. मात्र हा सगळा प्रकार मिनाक्षीला समजल्याने आरोपींनी तिचा खून केला. तिचं शरिर तिथल्याच सेफ्टी टँकमध्ये टाकण्यात आलं होतं. या प्रकरणात पोलिसांनी ३६ साक्षिदाराचे जबाब नोंदवत गुन्हेगारांना दोषी ठरवण्यात आलंय. गुरवारी आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे.