मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अडचणीत आता वाढ होणार आहे. प्राध्यापकांची संघटना बुक्टूनंतर आता विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेने मुंबई विद्यापीठाविरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलाय.
अभाविपच्या वतीने कंझ्यूमर कोर्टात केस दाखल करणार असून येत्या दोन दिवसात याचिका दाखल होणारे. यापूर्वीच हायकोर्टाने विद्यापीठाला पदवी परीक्षांच्या निकालावरुन फटकारले असून स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिलेत. आता कंझ्यूमर कोर्टात केस दाखल झाल्यावर विद्यापीठाला इथेही लढाई लढावी लागणार आहे.