आरे बचाव शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

 आरेचा मुद्दा मनसेने लावून धरला होता.

Updated: Sep 7, 2020, 12:35 PM IST
आरे बचाव शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला title=

मुंबई : राज्य सरकारने आरे मधील मेट्रो कारशेड रद्द करून हा भाग वन्य जीव संरक्षण म्हणून घोषित केल आहे. या सर्व आंदोलनात मनसेने सर्व संघटना साथ दिली होती. शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. आरेचा मुद्दा मनसेने लावून धरला होता. आरेतील आरे बचाव संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरे यांचे आभार मानले जात आहेत.

निवडणुकीच्या आधी सत्ता आल्यानंतर आरेला जंगल घोषित करणारच अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली होती. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ता आल्यानंतर आरेतील जंगलामध्ये असलेल्या झाडांवर कुऱ्हाड चालवणाऱ्यांना बघू असा इशारा दिला होता. सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिला निर्णय आरेबाबत घेतला होता. 

दुसरीकडे आरेमधील मेट्रो कारशेड दुसरीकडे हलवण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक ती तयारी केल्याचं देखील समोर आले आहे. ज्या ठिकाणी वृक्ष तोड झाली त्या ठिकाणी पर्यावरणाशी संबंधित वाईल्ड लाईफ फॉरेन्सिक लॅब किंवा वाईल्ड लाईफ रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर उभारण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते. 

आरे कारशेडवरुन भाजप आणि शिवसेना आमने-सामने आली होती. त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तव होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेड हलवण्याचा निर्णय घेतला होता.