मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भूमिकेवर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी टोला लगावला आहे. मुंबईत गिरगावात हनुमान मंदिरातील प्रतिष्ठापनेसाठी आले असता त्यांना भगवा कुर्ता घातल्याबद्दल विचारलं असता. त्यांनी यावरुन आपल्या काकांना टोमणा मारण्याची संधी सोडली नाही. मनसेच्या पुण्यातील हनुमान चालिसा कार्यक्रमाला अनुल्लेखानं मारणं त्यांनी पसंत केलं.
'दर 4 वर्षांनी कपड्यांचे रंग बदलून हिंदुत्व (Hindutva) येत नाही, ते रक्तात असावं लागतं,' असा टोला आदित्य ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लगावलाय.
शिवसेनेचे युवानेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी गिरगावच्या हनुमान मंदिरात महाआरती केली. राज ठाकरेंनी हनुमान चालिसाचं आवाहन केल्यानंतर शिवसेनेनंही ठिकठिकाणी महाआरतीचं आयोजन केलंय.
आदित्य ठाकरेंच्या या विधानावर पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.