Crime News : धावत्या बसमध्ये कंडक्टरनेच महिलेसमोर काढली पँट, UP, बिहार नव्हे महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

कंडक्टरने धावत्या बसमध्येच महिला प्रवाशासह अश्लिल कृत्य केले. या कंडक्टरने पँट काढून महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. 

Updated: Jan 20, 2023, 07:15 PM IST
Crime News : धावत्या बसमध्ये कंडक्टरनेच महिलेसमोर काढली पँट, UP, बिहार नव्हे महाराष्ट्रातील धक्कादायक घटना title=

Navi Mumbai Crime News : रात्रीच्या वेळेस बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेला धक्कादायक अनुभव आला आहे. बसच्या कंडक्टरनेच या प्रवासी महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे (bus conductor molested a female passenger). कंडक्टरने पँट काढून या महिलेसमोर अश्लिल कृत्य केले. UP, बिहार नव्हे महाराष्ट्रातील धक्कादायक घटना घडली आहे. नवी मुंबईत हा खळबळजनक प्रकार घडला आहे (Navi Mumbai Crime News). या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

नवी मुंबईत ही घटना घडलेय. रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळ हा सर्व प्रकार घडला. पनवेलहून रोहाकडे जाणाऱ्या बसमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. पीडित महिला ही पनवेलहून पेणला जात होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कंडक्टरला अटक केली आहे.  एसबी शिंदे असे आरोपी कंडक्टरचे नाव आहे. आरोपी विरुद्ध पेण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंडक्टरचे प्रवासी महिलेसमोर अश्लिल कृत्य

पीडित महिला पनवेलहून पेणला निघाली होती. पनवेल येथे ही महिला बसमध्ये चढली. महिलेला कंडक्टरच्या बाजूचीच सीट बसायला मिळाली. कंडक्टरने या महिलेला तिकीट देण्याच्या बहाण्याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. यांनतर तो बाजूला बसून महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करु लागला. महिलेने याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. आरडा ओरडाही केला. मात्र, आरोपी शिंदे आपली पँड काढून प्रायव्हेट पार्ट दाखवत या महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे अश्लिल कृत्य केले. कंडक्टरने या महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. बस पेणला पोहचताच या महिलेने थेट पोलिस ठाणे गाठले आणि कंडक्टर शिंदेने केलेल्या कृत्याची तक्रार केली. महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कंडक्टर एसबी शिंदे याला अटक केली. 

हा प्रकार घडला तेव्हा बसमध्ये इतर प्रवाशी नव्हते का? सह प्रवासी तसेच बसचा ड्रायव्हर महिलेचा आरोडा ओरडा ऐकून तिच्या मदतीला आले नाहीत का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही बस सार्वजनिक होती की खाजगी बस होती याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या घटनेमुळे रात्रीच्या वेळेस एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.