100 पैकी 96 अधिकारी आणि कर्मचारी दोषी

 या चौकशीमध्ये 100 पैकी 96 अधिकारी आणि कर्मचारी दोषी आढळले.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 6, 2018, 09:49 PM IST
100 पैकी 96 अधिकारी आणि कर्मचारी दोषी title=

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते घोटाळ्याप्रकरणी 100 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. या चौकशीमध्ये 100 पैकी 96 अधिकारी आणि कर्मचारी दोषी आढळले.

फक्त 4 जण निर्दोष असल्याचं सिद्ध 

फक्त  4 जण निर्दोष असल्याचं सिद्ध झालंय. दोषींपैकी 4 जणांना नोकरीतून बडतर्फ करण्यात आलंय. तर इतर जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

234 पैकी 34 रस्त्यांची चौकशी पूर्ण

मुंबईतल्या 234 पैकी 34 रस्त्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. उर्वरीत 200 रस्त्यांच्या कामातील त्रुटींची जबाबदारी निश्चित करण्याचे काम प्रगतीपथावर असून तो ही अहवाल लवकरच सादर होणार आहे. 

अहवालावरून आयुक्तांनी शिक्षा सुनावली

अतिरिक्त आयुक्तांच्या चौकशी अहवालानंतर कामाच्या स्वरुपानुसार जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश उपायुक्त विशेष अभियांत्रिकी रमेश बांबळे आणि चौकशी अधिकारी राजेंद्र रेळेकर यांना दिले होते. त्या अहवालावर आयुक्तांनी ही शिक्षा सुनावली आहे.