मुंबई : धारावीत कोराना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. धारावीत कोरोनाचे ५७ रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे आजच्या घडीला धारावीत कोरोना रुग्णांची संख्या ९१६ वर पोहोचली आहे. शिवाय एकून २९ जाणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. माहिममध्ये कोरोनाचे नवे १८ रूग्ण आढळले आहेत. माहिममध्ये आता एकूण कोरोना रूग्णांची संख्या १३७ वर पोहोचली आहे. तर एकूण ७ कोरोना रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.
त्याचप्रमाणे दादरमध्ये कोरोनाचे ५ नवे रूग्ण वाढले असून एकूण कोरोना रूग्णांची संख्या ११४ आहे. याठिकाणी कोरोनाने ६ जणांचा बळी घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढला आहे. पण या काळात बऱ्याच ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसत आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत २२ हजार १७१ रुग्ण आढळले आहेत. तर ८३२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वात मोठी आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत ८ हजार १९५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
गेल्या २४ तासांत भारतात ४ हजार २१३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे, तर आता भारतात कोरोना रुग्णांची संख्या ६७ हजार १५२ वर पोहोचली आहे. रविवारी ही संख्या ६२ हजार ९३९ एवढी होती.