मुंबई : राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत असताना एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कोविड-१९ची चाचणी केलेल्या ६७ पोलिसांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पोलीस दलात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आतापर्यंत ५९ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे नोंद करण्यात आली आहे.
कोविड-१९ची चाचणी केलेल्या ६७ पोलिसांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पोलीस दलात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, आतापर्यंत ५९ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे नोंद करण्यात आली आहे. #Corona #Coronavirus @ashish_jadhaohttps://t.co/kpo9phlA1j pic.twitter.com/Ck9FRCsl2c
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 30, 2020
कोरोनाविरुद्ध लढताना पोलिसांना सातत्याने ड्युटी करावी लागत आहे. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. सामान्य नागरिकांबरोबर वैद्यकीय कर्मचारी, पोलीस आणि संरक्षण दलातील जवानांना देखील करोनाची बाधा होत आहे. मागील चोवीस तासांत महाराष्ट्रातील पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याने चिंतेत भर पडली आहे.
67 more Maharashtra Police personnel tested positive for COVID19 in the last 24 hours; taking the total number of cases to 4810 and death toll to 59 in the force.
— ANI (@ANI) June 30, 2020
दरम्यान, सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) आणखी ५३ जण करोनाबाधित असल्याचे आढळले आहेत. तर चार जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या उपचार सुरु असलेल्यांची एकूण संख्या ३५४ झाली आहे. आतापर्यंत ६५९ जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती, बीएसएफकडून देण्यात आली आहे.