सत्तास्थापनेसाठी आठवलेंचा ५ : ३ : २ चा नवा फॉर्म्युला

सत्तेचा हा नवा फॉर्म्युला आठवलेंनी संजय राऊतांना सांगितलाय

Updated: Nov 19, 2019, 10:22 AM IST
सत्तास्थापनेसाठी आठवलेंचा ५ : ३ : २ चा नवा फॉर्म्युला

मुंबई : महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेच्या पेचात आरपीआय नेते रामदास आठवले यांनी सत्तेचा एक नवा फॉर्म्युला पुढं आणलाय... याच माध्यमातून आठवलेंनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षामध्ये नवा पत्ता टाकलाय. अडीच अडीच वर्षं मुख्यमंत्रिपदाच्या फॉर्म्युलाच्या पुढे एक पाऊल टाकत आठवलेंनी हा नवा फॉर्म्युला दिलाय. आठवलेंचा हा फॉर्म्युला आहे पाच-तीन-दोनचा फॉर्म्युला...

आठवलेंचा ५ : ३ : २ चा नवा फॉर्म्युला

- महाराष्ट्रातलं पाच वर्षांचं मुख्यमंत्रिपद

- त्यातले तीन वर्षं भाजपाचा मुख्यमंत्री

- आणि दोन वर्षं शिवसेनेचा मुख्यमंत्री

सत्तेचा हा नवा फॉर्म्युला आठवलेंनी संजय राऊतांना सांगितलाय. हा फॉर्म्युला आधी भाजपाच्या कानावर घाला, असा निरोप राऊतांनी दिलाय. आता आठवले लवकरच हा पाच - तीन - दोनचा फॉर्म्युला घेऊन भाजपा नेत्यांना गाठणार आहेत.