26/11 Mumbai Attack : या '५' जणांनी प्राणाची आहुती देत वाचवले हजारो प्राण

२६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या भयाण हल्ल्यास १२ वर्षे पूर्ण झाले. पाकिस्तानातून आलेल्या १० दहशतवाद्यांनी मुंबईला गोळीबार आणि बॉम्बस्फोटांनी हादरवलं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानक, नरीमन हाऊस, लियोपोल्ड कॅफे, ताज हॉटेल आणि टॉवर, ऑबेरॉय-ट्रायडेंट हॉटेल आणि कामा हॉस्पिटलला लक्ष्य केलं.

Updated: Nov 26, 2020, 12:51 PM IST
26/11 Mumbai Attack : या '५' जणांनी प्राणाची आहुती देत वाचवले हजारो प्राण title=

मुंबई : २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या भयाण हल्ल्यास १२ वर्षे पूर्ण झाले. पाकिस्तानातून आलेल्या १० दहशतवाद्यांनी मुंबईला गोळीबार आणि बॉम्बस्फोटांनी हादरवलं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानक, नरीमन हाऊस, लियोपोल्ड कॅफे, ताज हॉटेल आणि टॉवर, ऑबेरॉय-ट्रायडेंट हॉटेल आणि कामा हॉस्पिटलला लक्ष्य केलं.

या दहशतवादी हल्ल्यात साधारण १६० प्राण गेले तर ३०० हून अधिक जण जखमी झाले. ६० तासानंतर सुरक्षा जवानांना यश मिळालं. त्यांनी ९ दहशतवाद्यांचा खात्मा केला. शूर जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी दहशतवाद्यांशी दोन हात केले आणि हजारो निष्पापांचे प्राण वाचवले. देशकार्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या ५ शूर वीरांबद्दल आपण जाणून घेऊया.

हेमंत करकरे 

Hemant Karkare

त्यावेळी एटीएसचे प्रमुख होते. २६ नोव्हेंबरला रात्री ९.४५ ला हल्ल्याची माहिती मिळाली तेव्हा ते आपल्या घरी जेवत होते. त्यानंतर तात्काळ आपला बॉडीगार्ज आणि ड्रायव्हरसहीत सीएसएमटी स्थानकाकडे रवाना झाले. दहशतवादी कामा रुग्णालयाकडे गेल्याचे तिथे त्यांना कळाले. त्यांनी एसीपी अशोक कामटे, इन्स्पेक्टर विजय साळसकर यांच्यासोबत मोर्चा संभाळला. कामा हॉस्पीटलच्याबाहेर दहशतवाद्यांच्या अंधाधुंद फायरिंगमध्ये ते शहीद झाले. त्यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.

मुंबई पोलीस तुकाराम ओंबळे

Tukaram Omble

मुंबई पोलीस दलातील एएसआय तुकाराम ओंबळेंनी आपली शूरता दाखवत कोणत्याही हत्याराविना अजमल कसाबचा सामना केला आणि त्याला पकडून ठेवलं. या दरम्यान कसाबने त्यांच्यावर अंधाधुंद फायरिंग केली आणि ते शहीद झाले. तुकाराम ओंबळेंना सर्वोच्च वीरता पुरस्कार अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले. 

अशोक कामटे 

Ashok Kamte

मुंबई पोलिसातील एसपी अशोक कामटे हे रुग्णालयाजवळी चकमकीवेळी एटीएस चीफ हेमंत करकरेंसोबत उपस्थित होते. कामा हॉस्पिटलच्या बाहेर दहशतवादी इस्माइल खानने त्यांच्यावर अंधाधुंद गोळी चालवल्या. त्यातली एक गोळी त्यांच्या डोक्यात लागली. जखमी होऊनही अशोक कामटेंनी दहशतवाद्यांचा सामना केला.

विजय साळसकर 

Vijay Salaskar

विजय साळसकर हे मुंबई पोलीस दलातील एक ऑफीसर होते. ज्यांना एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हटले जायचे. ते कामा हॉस्पीटलबाहेर हेमंत करकरे आणि अशोक कामटेंसोबत उपस्थित होते. त्यांना मरणोत्त अशोक चक्क पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

संदीप उन्नीकृष्णन

Major Sandeep Unnikrishnan

नॅशनल सिक्यॉरीटी गार्ड्स (एनएसजी) चे कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन २६-११ हल्ल्यात मिशन ऑपरेशन ब्लॅक टारनेडोचे नेतृत्व करत होते. ताज हॉटेलसमोर झालेल्या लढाईत ते शहीद झाले. त्यांना २००९ साली मरणोत्तर अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले. 

They also showed bravery

या पाच जणांव्यतिरिक्त हवालदाक गजेंद्र सिंह, नागप्पा आर, महाले, किशोर शिंदे, संजय गोविळकर, सुनील कुमार यादव आणि इतरांनी वीरता दाखवली. याव्यतिरिक्त मॅनेजर करमबीर सिंहंनी आपल्या बहादुरीने पाहुण्यांचे जीव वाचवले.