हृदय शस्त्रक्रियेसाठी धावली २५ हजार बालके

  बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालय आणि श्री सिद्धिविनायक गणपती मंदीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 'लिटल हार्ट्स मॅरेथॉन २०१८' चे आयोजन करण्यात आले होते. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Jan 7, 2018, 03:12 PM IST
हृदय शस्त्रक्रियेसाठी धावली २५ हजार बालके title=

मुंबई :  बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालय आणि श्री सिद्धिविनायक गणपती मंदीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 'लिटल हार्ट्स मॅरेथॉन २०१८' चे आयोजन करण्यात आले होते. 

२५ हजारहून अधिक सहभागी 

यामध्ये २५ हजारहून अधिक जणांनी सहभाग घेतला. या मॅरेथॉनचे यंदाचे ५ वे वर्ष होते. 

निधी बाल हृदय शस्त्रक्रियेसाठी

या माध्यमातून जमा झालेला निधी बाल हृदय शस्त्रक्रियेसाठी वापरला जाणार आहे.  या मॅरेथॉनच्या निमित्ताने सुदृढ सक्रिया जीवनशैली अंगीकारण्याचा संदेशही यावेळी देण्यात येत आहे.

हृदयविकारांबद्दल जागृती

 या मॅरेथॉनच्या निमित्ताने अनेक जीव वाचवता आले आहेत आणि हृदयविकारांबद्दल जागृती निर्माण करता आल्याचे वाडिया रुग्णालयाच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले. 

'आम्हाला खूप काही करायचय'

 जी मुले हृदय शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादीत आहेत आणि वेळेवर उपचार केल्यास ज्यांचा जीव वाचवता येऊ शकतो, अशांसाठी आम्हाला खूप काही करायचे आहे, असे वाडिया समुहाचे व्यवस्थापकीय संचालक नेस वाडिया यांनी यावेळी सांगितले. 

मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांनी या मॅरेथॉनला हिरवा कंदील दाखवून मॅरेथॉनला सुरूवात झाली.

या वेळी खासदार अरविंद सावंत, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, नगरसेविका व माजी महापौर श्रध्दा जाधव, माजी नगरसेविका वैभवी चव्हाण,दिग्दर्शक राजेश म्हापूसकर, वाडिया समुहाचे व्यवस्थापकीय संचालक नेस वाडिया,  सीईओ डॉ. मिनी बोधनवाला हे मान्यवर उपस्थित होते.