मुंबई : राज्यात आज २२८७ नव्या कोरोनाबाधित रूग्णांचे निदान झाले आहे. तसेच राज्यात १०३ कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंज झाली आहे. तसेत राज्यात १२२५ रूग्ण बरे होऊन घरी गेले असून हा आकडा ३१,३३३ इतका आहे.
त्याचप्रमाणे राज्यात आज एखून ३८,४९३ ऍक्टिव्ह रूग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे. राज्यात आज २२८७ नव्या कोरोनाबाधित रूग्णांचे निदान झाले आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा ७२,३०० इतका नोंदवला आहे.
राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.३३% एवढा आहे. तर राज्यातील मृत्यू दर ३.४% इतका आहे. सध्या राज्यात ५,७०,४५३ लोकं होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२,५३८ खाटा उपलब्ध असून सध्या ३५,०९७ लोक संस्थेत क्वारंटाईन आहेत.
राज्यात आज 2287 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 72300 अशी झाली आहे. आज नवीन 1225 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 31333 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 38493 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 2, 2020
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ८० टक्के खाटा उपलब्ध करण्यास सहकार्य करत नसल्याची तक्रार असलेल्या मुंबईतील नामांकित चार रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
राज्य शासनाने कोरोना उपचारासाठी केलेल्या नियमांचे पालन न करण्यात आल्याने बॉम्बे हॉस्पीटल, जसलोक हॉस्पीटल, हिंदुजा हॉस्पीटल, लिलावती हॉस्पीटल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करणार.#CoronaVirusUpdates pic.twitter.com/PT2kM3aWF3
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 2, 2020
विशेष म्हणजे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी रात्री या रुग्णालयांना अचानक भेटी देऊन माहिती घेतली आणि त्यानंतर बॉम्बे, जसलोक, हिंदुजा आणि लिलावती चार रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली आहे.