मुंबई : राज्यातील कोरोना रुग्ण संख्येचं प्रमाण सतत वाढतं आहे. राज्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्ण संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. शनिवारी राज्यात उच्चांकी 20 हजार 489 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 312 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी 3 सप्टेंबर राज्यात 18 हजार 105 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली होती. तर शुक्रवारी 4 सप्टेंबर रोजी 19 हजार 218 नव्या कोरोना रुग्णांचं निदान झालं होतं.
राज्यात गेल्या 24 तासात 10 हजार 801 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 6 लाख 36 हजार 574 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 72.1 टक्के इतकं आहे.
आतापर्यंत राज्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 8 लाख 83 हजार 862 इतका झाला आहे. त्यापैकी सध्या राज्यात 2 लाख 20 हजार 661 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. महाराष्ट्रात एकूण 26 हजार 276 जण कोरोनामुळे दगावले असून सध्याचा राज्यातील मृत्यूदर 2.98 टक्के इतका आहे.
20,489 new #COVID19 positive cases, 10,801 discharges and 312 deaths reported in Maharashtra today. Total number of cases now at 8,83,862 including 6,36,574 discharges, 2,20,661 active cases and 26276 deaths: State Health Department
— ANI (@ANI) September 5, 2020
राज्यात आतापर्यंत 45,56,707 कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 8,83,862 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या 14,81,909 जण होम क्वारंटाईनमध्ये असून 37,196 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.