Mumbai Potholes : मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दोघांचा बळी

Mumbai Potholes : मुंबईत संतापनजनक घटना घडलीय. खड्ड्यांमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. 

Updated: Aug 17, 2022, 06:45 PM IST
Mumbai Potholes : मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दोघांचा बळी title=

गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : मुंबईत संतापजनक घटना घडलीय. खड्ड्यांमुळे (Mumbai Potholes) दोघांचा मृत्यू झाला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांनी दोघांचा बळी घेतलाय. मुंबईतील पश्चिम द्रुर्तगती महामार्गावरील (Western Express Highway) बोरीवलीत (Borivali) हा सर्व प्रकार घडलाय. या घटनेमुळे मुर्दाड प्रशासनाला केव्हा जाग येणार, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. मृतांमध्ये एक महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे. (2 people on bikes died in accident due to potholes on western express highway in mumbai at borivali)

नक्की काय झालं?

बाईकवरून दोघे जण वांद्रे इथून दहिसरला जात होते.  हे दोघे बोरिवली पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोहचले. संपूर्ण वेहवर (WEH) प्रचंड खड्डे आहेत.  या खड्ड्यांमुळे बाईक घसरली. त्यामुळे दोघे खाली पडले.

याचवेळेस मागून येणाऱ्या डंपरनं या दोघांना चिरडलं. त्यामुळे दुर्देवाने दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतलंय. तसेच मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

दरम्यान या सर्व प्रकारामुळे मुंबईतील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पावसाळ्यात खड्ड्यांचा प्रश्न अधिकच गंभीर होतो. पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज लागत नाही. त्यामुळे असे अनेक अपघात होतात. परिणामी नाहक बळी जातात. या घटनेमुळे आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.