मुंबईकरांच्या सेवेत १७ मिनी फायर इंजिन दाखल

अग्निशमन दलात १७ मिनी फायर इंजिन दाखल झालेत. यामुळं चिंचोळ्या गल्ली, झोपडपट्टी, चाळींमध्ये लागलेली आग तात्काळ विझवणं शक्य होणार आहे. 

Updated: Aug 23, 2017, 12:01 AM IST
मुंबईकरांच्या सेवेत  १७ मिनी फायर इंजिन दाखल  title=

मुंबई : अग्निशमन दलात १७ मिनी फायर इंजिन दाखल झालेत. यामुळं चिंचोळ्या गल्ली, झोपडपट्टी, चाळींमध्ये लागलेली आग तात्काळ विझवणं शक्य होणार आहे. 

पाण्याबरोबरच आग विझवणारी अत्याधुनिक साधने या मिनी फायर इंजिनमध्ये आहेत. ८१ मीटर उंचीची हायडृॉलिक शिडीही दलात सामील करण्यात आली. फायर ब्रिगेडच्या वडाळा कमांड सेंटरवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मिनी फायर इंजिनचे लोकापर्ण झाले.