देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई : मुंबईतील धारावीत सिलिंडर स्फोट (Dharavi Cylinder Blast) झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात एकूण 16 जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय. दुपारी 12.30 च्या दरम्यान घरात हा सिलिंडर स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने (Mumbai Fire Brigade) धाव घेतली. अग्निशमन दलाने तत्तपरतेने आग विझवली. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना नजीकच्या सायन रुग्णालयात (Sion Hospital) दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत. (16 people have been reported injured in the cylinder blast in Dharavi shahu nagar area)
नक्की काय घडलं?
"चाळीत असणाऱ्या एका घराच्या पहिल्या माळ्यावर गॅस बाटला लिक झाला. त्या घरातील व्यक्तींनी घाबरून पहिल्या माळ्यावरून बाटला खाली फेकला. त्यानंतर खाली गॅस पसरला आणि आग पसरली. या आगीत आसपासच्या घरात राहणारे गल्लीत असणारे लोक होरपळले", अशी माहिती स्थानिकांनी दिली.
जखमी झालेल्यांनी नावं आणि वय
1) राजेशकुमार जैस्वाल-45
2) अबिना बीबी शेख-27
3) गुलफान अली-29
4) अलिना अन्सारी-5
5) मोह. अब्दुल्ला एम-21
6) अस्माबानो एफ-18
7) फिरोज अहमद एम-35
8) फैयाज अन्सारी-16
9) प्रमोद यादव-37
10) अत्ताझम अन्सारी-4
प्रकृती गंभीर असलेल्यांनी माहिती
11) सातारादेवी जैस्वाल 50-60% भाजले, प्रकृती गंभीर.
12) शौकत अली 50-60% जळालेली स्थिती गंभीर.
13) सोनू जैस्वाल, चेहरा भाजला, प्रकृती गंभीर.
14) अंजू गौतम, चेहरा भाजला, प्रकृती गंभीर.
15) प्रेम जैस्वाल,चेहरा जळाला, प्रकृती गंभीर.