राज्यातील १४ पूल अत्यंत धोकायदायक स्थितीत

राज्यातील १४  पूल धोकादायक असल्याची माहिती पुढे आली आहे. 

Updated: Aug 5, 2017, 11:53 PM IST
राज्यातील १४ पूल अत्यंत धोकायदायक स्थितीत title=

मुंबई : राज्यातील १४  पूल धोकादायक असल्याची माहिती पुढे आली आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाने शुक्रवारी देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील १४७ अत्यंत जीर्ण झालेल्या आणि कधीही कोसळू शकणाऱ्या पुलांची यादी प्रसिद्ध केली.

 सांगली जिल्ह्यातील ४, सोलापूर जिल्ह्यातील ३, पुणे आणि नांदेड जिल्ह्यातील प्रत्येकी २ तसेच औरंगाबाद, कोल्हापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील प्रत्येकी एका पुलाचा समावेश आहे. 

पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवरील १४ पूल कधीही कोसळू शकतील, अशा धोकादायक अवस्थेत आहेत.