आतापर्यंत ११ लाखापेक्षा जास्त परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवले - गृहमंत्री

 आतापर्यंत ११ लाखांपेक्षा जास्त कामगार आणि मजुरांना  स्व:गृही पाठविले आहे, अशी माहिती राज्याचे  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

Updated: Jun 2, 2020, 07:33 AM IST
आतापर्यंत ११ लाखापेक्षा जास्त परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवले - गृहमंत्री title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोनाचे संकट असल्याने लॉकडान लागू करण्यात आला. आता पाचवा लॉकडाऊन ३० जूनपर्यंत सुरु राहणार आहे. दरम्यान, काही ठिकाणी शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात अनेक जण अडकून पडले होते. तर काहींची प्रचंड हाल झालेत. राज्यात परप्रांतीय कामगार आणि मजूर यांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्यासाठी एसटी आणि ८२२ विशेष श्रमिक रेल्वे सुरु करण्यात आल्यात. यातून आतापर्यंत ११ लाखांपेक्षा जास्त कामगार आणि मजुरांना स्व:गृही पाठविले आहे, अशी माहिती राज्याचे  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्रात विशेष करुन मुंबईमध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्व:गृही परत जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. एक मे एक जून या महिनाभरात  जवळपास ११ लाख ८६  हजार २१२ परप्रांतीय कामगारांना स्व:गृही परत पाठविण्यात आले.  यासाठी ८२२ विशेष श्रमिक ट्रेन  महाराष्ट्रातील विविध भागातून सोडण्यात आल्याची माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली.

आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये ४५० बिहारमध्ये १७७, मध्यप्रदेशमध्ये ३४, झारखंडमध्ये ३२, कर्नाटक मध्ये ६, ओरिसामध्ये १७, राजस्थान २०, पश्चिम बंगाल ४७, छत्तीसगडमध्ये ६ यासह इतर राज्यांमध्ये एकूण ८२२ ट्रेन या सोडण्यात आलेल्या आहेत.

राज्यातील सर्वच रेल्वे स्टेशनमधून या रेल्वे सोडण्यात येत असून यात प्रमुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलमधून  (सीएसएमटी) १३६, लोकमान्य टिळक टर्मिनल १५४, पनवेल ४५, भिवंडी ११, बोरीवली ७१, कल्याण १४, ठाणे ३७, बांद्रा टर्मिनल ६४, पुणे ७८, कोल्हापूर २५, सातारा १४, औरंगाबाद १२, नागपूर १४  यासह राज्यातील इतर रेल्वे स्टेशन वरून  विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.