मुंबई : आज राज्यात 10 हजार 309 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात आज एका दिवसात सर्वाधिक 334 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत असल्याची काहीशी दिलासादायक बाब आहे. आज दिवसभरात 6165 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 68 हजार 265 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत एकूण 3 लाख 5 हजार 521 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 65.25 टक्के इतकं आहे.
10,309 #COVID19 cases, 6,165 discharged & 334 deaths reported in Maharashtra today. Total number of cases in the state is now at 4,68,265, including 1,45,961 active cases, 3,05,521 recovered & 16,476 deaths: State Health Department pic.twitter.com/Vlw8QKMU2Z
— ANI (@ANI) August 5, 2020
सध्या राज्यात 1 लाख 45 हजार 961 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 हजार 476 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.52 टक्के इतका आहे.
राज्यात 9 लाख 43 हजार 658 जण होम क्वारंटाईनमध्ये असून 36 हजार 466 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.