नवी मुंबईत ७ स्कूलबसना आग

पहाटेच्या वेळी अचानक एका बसमध्ये स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचे बोलले जात आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 16, 2017, 10:21 AM IST
नवी मुंबईत ७ स्कूलबसना आग title=

नवी मुंबई : नवी मुंबईतल्या करावे गावाजवळ उभ्या असलेल्या ७ स्कूलबसना आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमागचे खरे कारण अद्याप समोर आले नसले तरीही 

पहाटेच्या वेळी अचानक एका बसमध्ये स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचे बोलले जात आहे. या आगीत एका पाठोपाठ एक उभ्या असलेल्या ७ स्कूल बस जळून खाक झाल्या. दरम्यान अचानक स्फोट झाल्यानें, परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. मात्र आगीवर वेळीच नियंत्रण मिळवलं गेलं. या सर्व स्कूलबस ज्ञानदीप शाळेच्या आहेत.