सनी लिऑनी आपल्या मुलीला 'हे' बनवू इच्छिते

सध्या या दोघांच्या जिवनात निशामुळे आनंद निर्माण झाला आहे. सनी आणि डेनियल निशाच्या अप-ब्रिंगिंगवर विशेष लक्ष देऊन आहेत. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 10, 2017, 08:38 AM IST
सनी लिऑनी आपल्या मुलीला 'हे' बनवू इच्छिते  title=

मुंबई : बॉलिवूड स्टार सनी लिओनी आणि तिचा पती डेनियल वेबर यांनी काही दिवसांपूर्वीच लातूर जिल्ह्यातून एका चिमुकलीला दत्तक घेतले.
यामुळे सनीच्या उदार मनाचे एक उदाहरण जगासमोर आले आहे. निशा असे या चिमुकलीचे नाव आहे. सध्या या दोघांच्या जिवनात निशामुळे आनंद निर्माण झाला आहे. सनी आणि डेनियल निशाच्या अप-ब्रिंगिंगवर विशेष लक्ष देऊन आहेत. तिच्या फ्यूचरविषयी दोघांनी स्वप्न रंगविली आहेत. आम्ही दोघेही स्वत:ला नशीबवान समजतो की, निशाने आमचा आई-वडील म्हणून स्वीकार केला आहे अशी प्रतिक्रीया सनीने दिली आहे. 

 

Mommy n dotty #sunnyleone #nishakaurweber #nishaweber #bollyholics__ #bollywoodinsta #bollywood

A post shared by BOLLYHOLICS (@bollyholics__) on

 ‘सध्या निशाच्या आयुष्यात नवा बदल होत आहे. सध्या आम्ही तिला एडजेस्ट करण्यासाठी मदत करीत आहोत. पुढे ती शाळेतही जाणार आहे. ती खूपच स्मार्ट असल्याचे सनीने 'स्टोरी पिक' ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 
 ती पुढे म्हणाली डेनियल आणि मी निशाला एक इंडिपेंडंट व्यक्ती बनवू इच्छितो. मग तिने भविष्यात एक अभिनेत्री म्हणून करिअर करावे किंवा एखादी डॉक्टर म्हणून तिने आयुष्यात पुढे जावे. तिचे स्वप्न साकार करण्यासाठी मी आणि डेनियल पुरेपूर प्रयत्न करीत आहोत.