Karuna Munde : धनंजय यांच्या अडचणी वाढणार? करुणा मुंढे यांची घोषणा, ''एक प्रेम कथा'' पुस्तक लवकरच

महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या माजी प्रेयसीने लवकरच प्रेमकथा लिहण्याचे जाहीर केले आहे

Updated: May 15, 2021, 10:56 AM IST
Karuna Munde : धनंजय यांच्या अडचणी वाढणार? करुणा मुंढे यांची घोषणा, ''एक प्रेम कथा'' पुस्तक लवकरच title=

बीड : महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या माजी प्रेयसीने लवकरच प्रेमकथा लिहण्याचे जाहीर केले आहे. करुणाने याबाबत फेसबुक पोस्ट लिहली आहे. तिने लिहले आहे की, माझ्या आयुष्यावर आधारित सत्य प्रेम जीवन कथा, लवकच प्रकाशित होईल. त्याचा फोटोही त्यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. ही प्रेमकथा धनंजय मुंडेंशी निगडीत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधान आलं आहे.

काही दिवसांपूर्वी करुणाच्या बहिणीने रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आऱोप केला होता. त्यानंतर मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली होती. सर्वच प्रकारचे प्रश्न उपस्थित होण्याआधीच धनंजय मुंडे यांनी आपल्या दूसऱ्या पत्नीशी म्हणजेच प्रेयसीशी असलेल्या संबधांबाबत स्वतःच कबूली दिली. त्यांनी करूणा शर्माशी असलेले संबध सार्वजनिकरित्या स्विकारले होते. 

धनंजय मुंडे यांनी सार्वजनिकरित्या त्यांच्या नात्याचा स्विकार केला. त्यावेळी दूसऱ्या पत्नीला असलेल्या दोन मुलांना देखील मुंडे यांनी स्वतःचे नाव लावले आहे. त्यांच्या शाळेच्या दाखल्यावर ते धनंजय मुंडे यांची मुले आहेत असे नमूद असल्याचाही खुलासा मुंडे यांनी त्यावेळी केला होता.

विशेष म्हणजे करुणा मुंढे यांनी ज्या पुस्तकाचं पहिलं पान फेसबूकवर शेअर केलं आहे, त्यावर धनंजय मुंडे यांचा फोटो नाही. मात्र त्यांनी स्वत:चं नाव लिहिताना खाली सौ.करुणा धनंजय मुंढे असं लिहिलं आहे.