नितेश राणेंच्या ट्वीटवर रुपाली चाकणकर म्हणाल्या...

भाजप आमदार नितेश राणे यांच्या ट्विटवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिलीय.  

Updated: Feb 22, 2022, 01:52 PM IST
नितेश राणेंच्या ट्वीटवर रुपाली चाकणकर म्हणाल्या...  title=

सोलापूर : दिवंगत अभिनेता सुशांत राजपूत याची एक्स मॅनेजर दिशा सालियान आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात कनेक्शन असल्याचे ट्विट  भाजप आमदार नितेश राणे यांनी केले होते. त्या ट्विटवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिलीय.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आरोपांबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाला पात्र पाठविले आहे. त्यानुसार राज्य महिला आयोगाने येत्या ४८ तासात मालवणी पोलिसांना चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा: नितेश राणे यांच्या ट्विटने खळबळ, दिशा सालियान आणि सचिन वाझे कनेक्शन

त्यानुसार मालवणी पोलिसांनी प्राथमिक तपास केलाय. त्यांचा अहवाल आल्यावर त्यात किती तथ्य आहे हे पाहून चाचपणी केली जाईल. राज्य महिला आयोग कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. तसेच, या प्रकरणी राज्य महिला आयोगाने कोणालाही नोटीस दिली नाही. मात्र, अहवाल आल्यावर त्यानुसार पुढील कारवाई होईल, असे सांगितले आहे.