SHOCKING NEWS : लगीन घरात पसरली स्मशान शांतता... लेकीच्या विदाईऐवजी निघाली वडिलांची अंत्ययात्रा

एका क्षणात आनंदाचा महौल दुखा:त बदलला.  मुलीच्या अंगावर लग्नाच्या अक्षदा टाकण्याआधीच पित्याचा मृत्यू झाला. 

Updated: Feb 15, 2023, 05:10 PM IST
SHOCKING NEWS : लगीन घरात पसरली स्मशान शांतता... लेकीच्या विदाईऐवजी निघाली वडिलांची अंत्ययात्रा title=

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : लग्न घर म्हटल की वेगळाच माहौल पहायला मिळतो. सगळेच आनंदात असतात. अशाच एका लगीन घरात अचानक स्मशान शांतता पसरली. मुलीच्या पाठवणी ऐवजी वडिलांची अंत्ययात्रा निघाली. जळगाव (Jalgaon) येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. मुलीच्या अंगावर लग्नाच्या अक्षदा टाकण्याआधीच वधु पित्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.

लग्नाच्या अक्षदा टाकण्याआधीच वधु पित्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या मांडवे बुद्रुक गावात ही घटना घडली.  या घटनेमुळे संपूर्ण गावावरच शोककळा पसरली आहे. 
अरुण कासम तडवी असे वधू पित्याचे नाव आहे. मुलीचे लग्न असल्याने तडवी खूपच आनंदी होते. आपल्या मुलीच्या विवाह निमित्त हळदीच्या कार्यक्रमात नाचतांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने तडवी यांचा मृत्यू झाला आहे.

लग्नाच्या स्वयंपाक करण्यासाठी निघालेल्या 17 महिलांना कारने चिरडले

पुणे-नगर महामार्गावर विचित्र अपघात घडला.  लग्नाच्या स्वयंपाक करण्यासाठी निघालेल्या 17 महिलांना कारने चिरडले. याच पाच महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पुणे नाशिक महामार्गावर शिरोलीतील खरपुडी फाट्याजवळ हा अपघात घडला आहे.  या महिलांना चिरडणारा भरधाव कार चालक रस्ता दुभाजक वरून महामार्गाच्या विरुद्ध वाजुला पुन्हा पळुन गेला. या कारचा राजगुरुनगर पोलीसांकडुन शोध सुरु होता. अखेर कारसह कार चालका सह कार मालकाला राजगुरुनगर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.