औरंगाबादेतील शाळा सुरू करण्याबाबत महत्वाची अपडेट; महापालिकेने घेतला हा निर्णय

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत महत्वाची अपडेट

Updated: Dec 10, 2021, 10:56 AM IST
औरंगाबादेतील शाळा सुरू करण्याबाबत महत्वाची अपडेट; महापालिकेने घेतला हा निर्णय title=

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याबाबत आढावा बैठक लांबणीवर टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 

 15 तारखेला महापालिका आढावा घेणार आणि त्यानंतर निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.  
 
 आज म्हणजेच 10 तारखेला महापालिका आढाव घेणार होती. परंतू हा निर्णय आता 15 तारखेला घेण्यात य़ेणार आहे.

सावधान ! कोरोना संक्रमणचा पुन्हा धोका वाढला, आर काऊंट वाढतोय

Risk of corona infection : कोरोनाबाबत राज्याची चिंता वाढवणारी बातमी आहे. कोरोना संक्रमणचा पुन्हा धोका वाढला आहे. आर काऊंट वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई पुणे ठाण्याचा आर काऊंट एक पेक्षा पुढे गेला आहे. त्यामुळे या शहरांत कोरोना संक्रमणचा वाढला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा आर काऊट एकच्या अगदी जवळ पोहोचला आहे. (R count is increasing In Maharashtra)

राज्यात कोरोनाचा आर काऊंट 1च्या जवळ पोहोचला आहे. मुंबई- पुण्यात आर काऊंट 1 च्या पुढे गेला आहे. कोरोना संकट संपण्यासाठी आर काऊंट1 पेक्षा कमी आवश्यक आहे.

मात्र, संक्रमित व्यक्तीद्वारे संसर्ग पसरवण्याचा दर पुन्हा वाढल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे.