आला अंगावर तर घेतला शिंगावर ..! बैलाशी पंगा घेणं पडलं महागात

सोशल मीडियावर  व्हिडिओ व्हायरल होतोय. 

Updated: May 20, 2022, 06:23 PM IST
आला अंगावर तर घेतला शिंगावर ..! बैलाशी पंगा घेणं पडलं महागात title=

हेमंत चापुडे, खेड : आला अंगावर तर घेतला शिंगावर, असं काहीचं बैलगाडा शर्यतीच्या बैलाने बैलगाडा घाटात करुन दाखवलं. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

सात वर्षाच्या प्रतिक्षेनंतर बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाली आणि गावगाड्यांवर बैलगाडा शर्यतीचा नाद घुमु लागलाय बैलगाडा घाटाच्या शर्यतीकडे तरुणाईचा ही चांगलाच सहभाग पहायला मिळतोय.

मात्र अशात बैलगाडा घाटात बैल पकडत असताना चक्क बैलगाडा मालकालाच शिंगावर घेत गोल फिरवलाय त्याने बैलगाडा शर्यतीचा नाद करा मात्र बैलाचा नाय...नाही तर कधी शिंगावर घेतलं जाईल याचा नेम नाही.