कळंबोलीत १२ व्या मजल्यावरुन कोसळून तरुणीचा मृत्यू

१२ व्या मजल्यावरून कोसळून कळंबोलीत तरूणीचा मृत्यू झालाय.

Updated: Jan 13, 2020, 08:11 AM IST
कळंबोलीत १२ व्या मजल्यावरुन कोसळून तरुणीचा मृत्यू  title=

कळंबोली : १२ व्या मजल्यावरून कोसळून कळंबोलीत तरूणीचा मृत्यू झालाय. खारघरच्या सेक्टर ३५ मध्ये ही घटना घडलीय. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. गुरूशरणजीत कौर असं मुलीचं नाव आहे. ही मुलगी नातेवाईकांकडे राहायला आली होती. ही मुलगी १२ व्या मजल्यावरून खाली पडली कशी याचा शोध सुरू आहे. 

पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. तरुणीचे नातेवाईक आणि शेजारी यांच्याकडे माहिती विचारली जात आहे. या घटनेचा कोणी प्रत्यक्षदर्शी आहे का ? हे पाहिले जात आहे. हा अपघात होता की घातपात होता ? याचा तपास केला जात आहे.