योगी आदित्यनाथ आणि अमित शहांच्या आज महाराष्ट्रात सभा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही महाराष्ट्रातल्या प्रचारात सक्रीय 

Updated: Oct 10, 2019, 09:36 AM IST
योगी आदित्यनाथ आणि अमित शहांच्या आज महाराष्ट्रात सभा title=

मुंबई : प्रचारसभांचा धडाका तर सर्व पक्षांच्या नेत्यांचा सुरू आहे. मात्र आज भाजपच्या स्टार आणि दिग्गज नेत्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य़नाथ आज महाराष्ट्रात आहेत. दोघांच्याही दिवसभर सभा असणार आहेत. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही महाराष्ट्रातल्या प्रचारात सक्रीय झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आज महाराष्ट्रात चार सभा होणार आहेत. परभणीतील सेलू, जळगावमधल्या रावेरमध्ये सभा होणार आहेत. तसंच मुंबईत काळबादेवी आणि कांदिवलीतही त्यांची सभा होणार आहे. 

अमित शाह यांच्या आज जत, अक्कलकोट, तुळजापूर आणि औसामध्ये सभा आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सोलापुरातल्या मंगळवेढा, नातेपुते, साताऱ्यातल्या म्हसवड, फलटणमध्ये सभा रंगणार आहे. पुण्याच्या भोसरीमध्ये तसंच पिंपरी-चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभा आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. जालन्यातील घनसावंगी, औरंगाबादेतील वैजापूर, कन्नड आणि औरंगाबाद शहरामध्ये उद्धव ठाकरेंच्या सभा होणार आहेत.