Shiv Sena Crisis: पक्ष गेला, चिन्ह गेले आता शिवसेना भवनही ठाकरेंच्या ताब्यातून जाणार? शिवाई ट्रस्ट विरोधात तक्रार

पक्षाच नाव आणि चिन्ह गमावल्यानतंर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या समोर एका पाठोपाठ एक अशी एनेक आव्हाने येत आहेत. त्यातच आता शिवसेना भवनही (shivsena bhavan) उद्धव ठाकरेंच्या हातातून जाणार की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे (Shiv Sena Crisis).

Updated: Feb 20, 2023, 07:16 PM IST
Shiv Sena Crisis: पक्ष गेला, चिन्ह गेले आता शिवसेना भवनही ठाकरेंच्या ताब्यातून जाणार? शिवाई ट्रस्ट विरोधात तक्रार  title=

Shiv Sena Crisis and shivsena bhavan : केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे  'शिवसेना' (Shiv Sena) हे नाव  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अर्थात शिंदे गटाला दिल्याने  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जबरसदस्त झटका बसला आहे.  पक्ष गेला, चिन्ह गेले आता शिवसेना भवनही ठाकरेंच्या ताब्यातून जाण्याची शक्यता आहे.  शिवसेना भवन आणि शिवाई ट्रस्ट विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. योगेश देशपांडे (Yogesh Deshpande) यांनी ही तक्रार दिली आहे (Maharashtra Politics) . शिवाई पब्लिक ट्रस्ट आहे. शिवसेना भवनावर शिवाई ट्रस्टची मालकी आहे. एखाद्या राजकीय पक्षाला ट्रस्टची वास्तू का वापरु दिली? असा सवाल योगेश देशपांडे यांनी आपल्या तक्रारीत उपस्थित केला आहे.

 इतक्या वर्षांपासून शिवसेना भवन शिवेसनेचेच आहे असं सगळ्यांना वाटत होते. शिवसेना भवन कुणाचे आहे? शिवसेना भवनावर कुणाची मालकी आहे? अशी सर्व गोपनीय ठेवण्यात आली होती. शिवसेनेच्या वादानंतर शिवसेना भवनाबाबतची माहिती देखील समोर आली आहे. 

शिवसेना ठाकरे गटाचं मुख्यालय असलेल्या शिवसेना भवनाच्या राजकीय वापराला आक्षेप घेण्यात आला आहे. शिवसेना भवनाचा कारभार शिवाई ट्रस्टच्या वतीनं चालवला जातो. या ट्रस्टच्या विरोधात योगेश देशपांडे यांनी धर्मादाय आयुक्तांकडं याचिका दाखल केली आहे.

शिवाई ट्रस्टच्या मालमत्तेचा राजकीय वापर कसा होतो, अशी विचारणा देशपांडेंनी या याचिकेत केली आहे. ही जागा शिवाई ट्रस्टची असल्याचं समोर आले. कोणत्याही ट्रस्टला जागा भाड्यावर देता येत नाही.  परवानगी नसताना शिवसेना भवन हे राजकीय पक्षाचं कार्यलाय म्हणून इतके दिवस का वापरलं गेल याचे उत्तर देशपांडे यांनी या तक्रारीद्वारे मागितले आहे. 

शिवसेना भवनाचा इतिहास काय? 

शिवसेनेच्या स्थापनेनंतर 8 वर्षांनी म्हणजे 1974 मध्ये पहिल्यांदा शिवसेना भवन उभारलं गेलं. शिवसेना भवन ही शिवाई ट्रस्टची संपत्ती आहे. शिवसेना भवन तयार करताना आर्टिकेटनं किल्ल्यासारखा आकार देण्याचं ठरवलं. खुद्द बाळासाहेब ठाकरे शिवसेना भवनाच्या बांधकामावर लक्ष ठेवून होते. मीनाताई ठाकरेंच्या इच्छेनुसार शिवसेना भवनात आंबेमातेचं मंदिर उभारण्यात आलं. महाराष्ट्रात कुठल्याही राजकीय पक्षाचं इतकं भव्य पक्ष कार्यालय नाही. वर्गणीच्या माध्यमातून शिवसेना भवन उभं राहिलं आहे.