मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटीला यवतमाळ येथे अपघात, तीन ठार २२ जखमी

यवतमाळ अपघातात तीन मजूर प्रवासी जागीच ठार झालेत. तर २२ मजूर जखमी झाले आहेत. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

Updated: May 19, 2020, 09:22 AM IST
मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटीला यवतमाळ येथे अपघात, तीन ठार २२ जखमी title=

यवतमाळ : परप्रांतीय मजुरांना आपल्या गावी एसटीने सोडण्यात येत होते. मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटीला आर्णी जवळील कोळवनगावाजवळ अपघात झाला. एसटीने टंपरला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन मजूर ठार झालेत तर २२ जखमी असून एकाची प्रकृती गंभीर आहे.  सोलापूर येथून मजूर एसटीने झारखंड राज्यात जात होते. जखमींना उपचारासाठी आर्णी आणि यवतमाळ येथे दाखल करण्यात आले आहे.

कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक उद्योग धंदे बंद आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. हातात पैसा नाही. खायला काहीही नसल्याने अनेक मजूर परतीचा प्रवास करत आहेत. अशाच मजुरांना त्यांच्या गावाला घेऊन जाणाऱ्या एसटीला अपघात झाला आहे. एसटीने टंपरला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात गाडीतील तीन मजूर प्रवासी जागीच ठार झालेत. तर २२ मजूर जखमी झाले आहेत. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर आर्णी आणि यवतमाळ येथे उपचार सुरु आहेत.

दुसऱ्या अपघातात एक ठार, १० जखमी

दरम्यान, दुसऱ्या एका अपघातात नांदेड - सोलापूर येथून बिहार राज्यात प्रवाशी मजूर घेऊन जाणाऱ्या खाजसगी बसला अपघात झाला आहे.  रात्री ११ वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला.  नांदेड लातूर मार्गावर अपघात हा अपघात झाला आहे. लोहा तालुक्यातील खेड़करवाडी जवळ बस उलटली. या अपघातात  एका मजूराचा मृत्यू झाला असून १० जण गंभीर जखमी झाले आहेत.