यवतमाळमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवर सुर्दापूरमध्ये सुरु असलेल्या आंतरराज्यीय जुगार अड्ड्यावर पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिका-यांनी छापा मारला. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Nov 26, 2017, 05:35 PM IST
यवतमाळमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा title=

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवर सुर्दापूरमध्ये सुरु असलेल्या आंतरराज्यीय जुगार अड्ड्यावर पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिका-यांनी छापा मारला. 

गेल्या कित्येक वर्षांपासून राजरोसपणे या भागात जुगाराचे आलिशान अड्डे चालवले जायचे. पोलीस प्रशासनावर अनेकदा प्रश्न उपस्थित झाले. अखेरीस एसडीपीओ अमोल कोळी यांच्या पथकानं धाड घातली. 

या धाडीत तेलंगणा-आंध्रप्रदेशातील रंगारेड्डी, करीमनगर, आदिलाबाद, हैदराबाद आणि जगतीयार या जिल्ह्यातील 23 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून55 लाख 49 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.