नीलेश खरमारे / Dangerous use of mountain ladder to carry home a woman : आता धक्कादायक बातमी पुण्यातून. भोर तालुक्यातील बाळंतीन महिलेला घरी पोहोचण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागतेय. 5 दिवसांपूर्वी या महिलेची प्रसुती झाली होती. रायरेश्वर पठारावर या महिलेची वस्ती आहे. तिथं पोहोचण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे झोळी करुन लोखंडी पुलावरुन धोकादायक पद्धतीनं या महिलेला घरी नेण्यात आले. हे सगळ जीवार उदार होऊनच. 4 हजार 500 फूट उंचीवर राहणाऱ्या या वस्तीवरील लोकांना अशा लोंखडी धोकादायक शिडीचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे पर्यायी रस्ता तयार करण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे.
रायरेश्वर पठरावर राहणाऱ्या एका बाळंतीन महिलेला, तिच्या बाळासह पठरावरील घरी नेतानाचा एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. झोळी करुन लोखंडी शिडीवरून धोकादायक पद्धतीने न्यावं लागतं असल्याचा व्हिडिओ आहे. जाण्या - येण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने याठिकाणच्या नागरिकांना अनेक वर्षांपासून कसरत करावी लागत आहे. तीही जीवावर उदार होऊन. त्यामुळे पठारावरील कुटुंबांसाठी आणि पर्यटन विकासासाठी रोप-वेची मागणी होत आहे.
नुकतीच प्रसूती झालेल्या एका महिलेला आणि तिच्या बाळाला झोळीत बसून उंच अश्या रायरेश्वर पठारावऱ्याच्या कड्यातून नेतानाचा एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. रायरेश्वर पठारावर जाण्यासाठी सोयीचा दुसरा मार्ग नसल्यानं 4500 फूट उंच असणाऱ्या पठरावर झोळी करून लोखंडी शिडीवरून धोकादायक पद्धतीने न्यावं लागतं असल्याचा हा व्हिडिओ आहे. योगिता विक्रम जंगम असे या बाळंतीन महिलेच नाव आहे. 5 दिवसांपूर्वी या महिलेची प्रसूती झाली होती. तिला घरी नेण्यासाठी अशी कसरत करावी लागली.
दुर्गम भागात रायरेश्वर किल्ल्याजवळ असणाऱ्या या 6 किलोमीटर पर्यंत पसरलेल्या पठरावर शेकडो वर्षांपासून जवळपास 50 कुटुंबांच वास्तव्य आहे. मात्र अद्यापही अनेक सोसी-सुविधा झालेल्या नाही. आजही ये-जा करण्यासाठी धोकादायक पद्धतीने या शिडीचा वापर करावा लागत आहे. कोणी आजारी पडलं अथवा इतर आपत्कालीन परिस्थितीमध्ये या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांना अशाच प्रकारची कसरत करत, धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत आहे.