क्रुरता! सासुने सुनेच्या बांगड्या फोडल्या, नंतर तोंडात कोंबून डोकं भिंतीवर आपटलं

Buldhana Crime News: महाराष्ट्र पुन्हा हादरला! सासुने सुनेच्या बांगड्या फोडून तोंडात कोंबल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. 

क्रुरता! सासुने सुनेच्या बांगड्या फोडल्या, नंतर तोंडात कोंबून डोकं भिंतीवर आपटलं title=
women broke daughter in law bangles and put them into the womans mouth in buldhana

Buldhana Crime News: महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून धक्कादायक गोष्टी घडत आहेत. चर्चगेट येथील हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीची हत्याप्रकरण (Churchgate Hostel Horror), तर मिरारोडमध्ये (Miraroad Murder Case) महिलेची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केल्याचे प्रकरण असो या दोन घटनांनी देश हादरला आहे. त्यातच आता बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्क्दायक प्रकार समोर आला आहे. सासरच्या मंडळींनी विवाहित महिलेच्या बांगड्या फोडून जबदरस्ती तिच्या तोंडात भरवण्यात आल्या आहेत. त्यानंतर तिला अमानुष मारहाण करण्यात आली. पीडितेच्या वडिलांनी आणि भावाने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षांच्या पीडितेचा निकाह दोनगाव येथे राहणाऱ्या फिरोज खानसोबत झाला होता. पती फिरोज खान आणि त्याची आई सातत्याने पीडित महिलेला माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ करत होते. मात्र, महिलेने माहेरुन पैसे आणण्यास नकार दिला. याआधीही तिच्या वडिलांनी कर्ज काढून तिच्या सासरी पैसे दिले होते. त्यामुळं आता पुन्हा त्यांना पैसे देणे शक्य होणार नाही, असं तिने तिच्या पतीला सांगितले. 

सूनेने वडिलांकडून पैसे आणण्यास नकार दिल्याने तिच्या सासूला राग अनावर झाला. तिने पहिले पीडित महिलेच्या बांगड्या फोडल्या, त्यानंतर बांगड्याचे तुकडे महिलेच्या तोंडात जबरदस्ती कोंबले. इतकंच नव्हे तर तिच्या पतीने तिचे डोके भिंतीवर दोन ते तीन वेळा आपटले. गंभीर मार बसल्यामुळं पीडिता बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. त्यानंतर तिच्या पती व सासूने आठ दिवस तिला घरातच डांबून ठेवले. 

पीडित महिलेच्या सासूने तिच्या वडिलांना फोन करुन तुमच्या मुलीला इथून घेऊन जा, असं सांगितले. त्यानंतर तिचे वडील आणि भाऊ तिला नेण्यासाठी आले पण तिची अवस्था पाहून ते हादरले. त्यानंतर त्यांनी तिला बुलढाण्यातील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. सध्या पीडीतेला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

जालना जिल्ह्यातील डोनगाव पोलिसांना याप्रकरणी माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पीडितेचे रिपॉर्ट आणि तिच्या कुटुंबीयांनी दिलेला जबाबाआधारे तक्रार दाखल केली आहे. व पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 

शिव्या दिल्या म्हणून केली हत्या

आई बहणीला शिव्या दिल्या म्हणून चक्क नागपूर रेल्वे स्टेशच्या क्रमांक चारच्या फलाटावर एका व्यक्तीची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये लोहमार्ग पोलिसांनी दिनेश सदाफुले नामक आरोपीला अटक केलीय. तेच जितेंद्र असं मृतकाचे नाव असून तो छत्तीसगडचा असल्याची माहिती समोर आली आहे. या खळबळजनक घटनेमुळे नागपूर रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा वाऱ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे.