करंजी घाटात अवघड वळणावर ताबा सुटला, ट्रक 25 फूट खोल दरीत कोसळला अन्...

Accident News In Marathi: अहमदनगरमध्ये एका ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. यात ट्रक २५ फूट दरीत कोसळला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 10, 2023, 11:46 AM IST
करंजी घाटात अवघड वळणावर ताबा सुटला, ट्रक 25 फूट खोल दरीत कोसळला अन्... title=
Truck crashes into Karajna Ghat in ahmednagar driver died

Truck Accident In Ahmednagar: अहमदनगर येथील विशाखापटनम राष्ट्रीय महामार्गावर करंजी घाटात ट्रकचा ताबा सुटल्याने मोठा अपघात घडला आहे. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून क्लीनर बचावला आहे. अवघड वळणावर ट्रकवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला आहे. (Accident News In Marathi)
 
ट्रक 25 फूट खोल कोसळला

नगरहून बीडकडे रासायनिक खत घेऊन हा ट्रक चालला होता. सकाळी सात वाजेच्या सुमारास करंजी घाटातून जात असताना चालक माणिक शहा याचा तिथे दर्ग्याजवळ असलेल्या वळणावर ताबा सुटला आणि ट्रक 25 फूट खोल दरीत जाऊन कोसळला आहे. यात केज तालुक्यातील शैलेश लोंढे या ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे.

ट्रकचे मोठे नुकसान

तर ट्रक दरीत कोसळल्याने ट्रकचे मोठे नुकसान झाले असून ट्रकमध्ये असलेले रासायनिक खत बाहेर पडले आहे. दरम्यान घटनेची माहिती कळतच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अपघातामुळे रहदारीला अडथळा होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे.

यवतमाळमध्ये अज्ञातांनी कारच्या काचा फोडल्या

यवतमाळ शहरात गावगुंडांचा हैदोस वाढला असून जामनकर नगर परिसरात गावगुंडांनी चार चाकी वाहनांच्या काचा फोडल्या आहेत. रहिवाशांनी आपली चार चाकी कार घराशेजारी उभ्या करून ठेवली होती. त्यावेळी अज्ञात तीन ते चार जणांनी या वाहनाच्या काचा फोडल्या. शिवाय धुडगूस घालून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या आधीही परिसरात वाहनांच्या काचा फोडल्याचा प्रकार घडला होता. दरम्यान, याप्रकरणी अवधूत वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून गावगुंडांना आवर घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

बीडमध्ये अपघातात डॉक्टरांचा मृत्यू 

अंबाजोगाई - आडस येथील आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आटोपून दोन्ही डॉक्टर अंबाजोगाईला जात होते. त्याचवेळी चनईजवळ त्यांची कार झाडाला आदळली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला आहे. तर कारमधील काही काचा आत घुसल्या आहेत. अपघात इतका भीषण होता की दोन्ही डॉक्टरांचा यात मृत्यू झाला आहे. डॉ. प्रमोद राजाभाऊ बुरांडे (वय ३९) आणि डॉ. रवी संतोष सातपुते (वय ३८) अंबाजोगाई असं मृत्यू झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत. डॉ. प्रमोद बुरांडे आणि डॉ. रवी सातपुते हे दोघेही निष्णात फिजिओथेरपिस्ट होते.