ओला कॅबच्या ड्रायव्हरने तरुणीसह... कल्याणमधील धक्कादायक प्रकार

कल्याणमध्ये कॅबमधून प्रवास करणा-या महिलेचा विनयभंग झाला आहे. रात्री ऑफिसमधून परतताना तिच्यासह हा प्रकार  घडला. कॅबचालकाला अटक करण्यात आली. 

Updated: Oct 17, 2023, 09:37 PM IST
ओला कॅबच्या ड्रायव्हरने तरुणीसह... कल्याणमधील धक्कादायक प्रकार title=

Kalyan Crime News : महिलांनो, खासगी कॅबमधून प्रवास करत असाल तर सावधान! कल्याणमध्ये कॅबमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेचा विनयभंग झाला आहे. रात्री ऑफिसमधून परतताना तिच्यासह हा प्रकार घडला. कॅबचालकाला अटक करण्यात आली आहे. कल्याण परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

ओला कॅब चालकानं एका तरुणीचा विनयभंग केला. ही तरुणी नवी मुंबईमधल्या ऑफिसमधून रात्री निघाली. ती कल्याणला प्रवास करत होती. यावेळी कॅबचालकानं तिचा विनयभंग केला. पीडितेने आरडा ओरडा करताच कॅब चालकाने तरुणीला खाली उतरवलं आणि पळून गेला. या प्रकरणी पोलिसांनी राकेश जयस्वालला बेड्या ठोकल्यायत. या घटनेमुळे रात्री प्रवास करणा-या महिला सुरक्षित आहेत का, असा प्रश्न निर्माण झालाय.  

महिलेवर चोरट्याचा प्राणघातक हल्ला

कल्याण मध्ये एका तरुणीची विनयभंग चे बातमी ताजी असता एका महिलेवर चोरट्याने प्राणघातक हल्ला केला आहे. मुलीला शाळेतून घरी आणत असताना महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पालन करणाऱ्या चोरट्याला प्रतिकार केल्याने तिच्यावर चाकूने सपासप वार करून तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. कल्याणच्या आंबिवली परिसर ही घटना घडली.  प्रिया सावंत असे जखमी महिलेचे नाव असून तिच्यावर कळवा येथील शासकीय रुग्णालांमध्ये उपचार सुरू आहेत.

कल्याण जवळील आंबिवली गावात घडली.  प्रिया या नेहमीप्रमाणे मुलीला शाळेतून येण्यासाठी घरातून निघाली त्यावेळी त्यावर उपाय जात असताना पाठीमागून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले. तेव्हा प्रिया यांनी त्याला जोरदार प्रतिकार केला. यावेळी चोरट्याने त्याच्या जवळील धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर, हातावर, मानेवर चाकूने सपासप वार करून पळून गेला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रिया यांना नागरिकांनी जवळच्या खाजगी रुग्णांना दाखल केले. त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हल्लेखोर चोराचा शोध सुरु आहेत दरम्यान कल्याण परिमंडळ 3 मध्ये दररोज महिलांवरील होणारे जीवघेणे हल्ल्याचे प्रमाण दिवसां गणित वाढतच असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे .

कल्याणमध्ये देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

कल्याण पूर्वेच्या होम बाबा टेकडीवर हा प्रकार घडलाय.पीडित महिला या टेकडीवर असलेल्या देवस्थानाच्या ठिकाणी दर्शनासाठी जात होती. त्या वेळेस वाटेत एका अज्ञाताने पीडितेला अडवत तिच्या वर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस या महिलेने त्याला प्रतिकार केल्यानंतर पुढचा अनर्थ टाळला. मात्र, या आरोपीने संधी साधत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून जाण्यास यशस्वी झाला.

रिक्षा चालकाकडून महिलेवर अतिप्रसंग

9 सप्टेंबर रोजी एक महिला डोंबिवलीच्या खिडकाळेश्वर मंदिरात दर्शन घेऊन कोळेगाव येथे रिक्षातुन घरी येत होती. यावेळी महिलेचे रिक्षा चालकाने तिचे अपहरण केले. त्यानंतर निर्जन स्थळी नेऊन तिच्या वर साथीदाराच्या मदतीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.